कतरम बदधमतत आण डजटल इतहस लखन: सध, आवहन व भवषय

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि डिजिटल इतिहास लेखन हा विषय सध्याच्या संशोधनात अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. २१व्या शतकात डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे इतिहास लेखनाच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना संशोधनाच्या पद्धती, माहितीचे विश्लेषण आणि निष्कर्ष निर्मिती यामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.इतिहास ही एक स्वायत्त ज्ञानशाखा आहे हा विचार आज सर्वमान्य झालेला आहे. इतिहास हे केवळ शास्त्र आहे, हे प्रा. बरी यांचे विधान वादग्रस्त असले तरी इतिहासाचे स्वतंत्र शास्त्र आहे,त्याच्या अध्ययनाची, संशोधनाची व लेखनाची निश्चित पद्धती आहे. इतिहासशास्त्र हे पारंपारिकदृष्ट्या दस्तऐवज, अभिलेख, शिलालेख, साहित्य आणि मौखिक परंपरा यावर आधारित क्षेत्र आहे; परंतु आज डिजिटल तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त साधन म्हणून उदयास आले आहे. प्रस्तुत लेखात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल इतिहासलेखन यांचा परस्परसंबंध, त्यातून निर्माण झालेल्या संधी, तसेच नैतिक आणि शैक्षणिक आव्हानांचा अभ्यास करण्यात आलेला आहे.

Paper

The full text of this publication is not hosted on 44B due to licensing.

Read it at OpenAlex

Similar papers

© 2026 NYSGPT2525 LLC